सोमय्यांमुळे अनिल परब पळून गेले मग न्याय कोण देणार – प्रविण दरेकर

32

मुंबई: राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटीचे कर्मचारी संपावर आहेत. तसेच कर्मचाऱ्यांकडून सरकार विरोधात आंदोलन सुरू आहेत. या आंदोलनात आता भाजपाने उडी घेतली आहे. या आंदोलनाला विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पाठींबा दर्शविला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन अधिक पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईतील आझाद मैदानात एसटी कर्मचारी हजारोंच्या संख्येने जमले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना प्रवीण दरेकर आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी परिवहन मंत्री अनिल परबांसह महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढवला आहे.

भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यामुळे अनिल परब यांना पळून जायला नको होते. परब पळून गेले तर आता आम्हाला न्याय कोण देणार? असा खोचक सवाल करत कर्मचाऱ्यांच्या जीवावर तुम्ही मोठे झाले आहात. आता कर्मचाऱ्यांचा विचार करा. तुम्ही एसीत बसा पण आम्हाला एसटी कर्मचाऱ्यांना बसायला तरी व्यवस्थित जागा द्या, अशी त्यांनी केली आहे. अजूनही मंत्रालयात बसलेल्यांना जाग येत नाही. एसटी कर्मचाऱ्यांसाठी शंभरवेळा उंबरठे झिजवायला तयार आहे. न्याय मिळवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही दरेकरांनी यावेळी दिला आहे.

संकटकाळी एसटी कर्मचारी तुम्हाला साथ देतात. पण जेव्हा विलीनीकरणाचा मुद्दा पुढे आला तेव्हा तुम्ही अवमान याचिका दाखल केली. जेव्हा एखादा कर्मचारी अडचणीत असतो तेव्हा तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करता. मी येथे विरोधी पक्षनेता म्हणून नाही तर एसटी कर्मचाऱ्याचा मुलगा म्हणून मी तुमच्यासमोर आलो आहे, अशी खंतही दरेकरांनी व्यक्त केली. एवढेच नव्हे तर विलीनीकरणाचा निर्णय घ्या आणि मगच चर्चेला येण्याचे आवाहन त्यांनी राज्य सरकारला केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.