पुण्यात फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग; साहित्य जाळून खाक

28

पुणे: पुण्यातील पिसोळी येथील दगडे वस्तीत असलेल्या एका लाकडी सामानाच्या फर्निचर गोडाउनला भीषण आग लागली. या आगीत सर्व साहित्य हे जळून खाक झाले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मध्यरात्रीच्या सुमारास आग लागल्यानंतर पुणे व पीएमआरडीएच्या 14 अग्निशमन वाहन व जवानांच्या साह्याने आग नियंत्रणात आली असून कुलिंगचे काम सुरू आहे.

पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास दगडे वस्तीतल्या एक लाकडी सामानाच्या फर्निचर गोडाऊनला भीषण आग लागली आहे. या आगीचे व्हिडिओ आता समोर आले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पुणे आणि पीएमआरडीए १४ अग्निशमन दलांच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांच्या अथक प्रयत्नानंतर ३ तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. जवळपास २४ हजार स्वेक्वअर फूट असलेले गोडाऊन या आगीत जाळून खाक झाले आहे. गोडाऊनमधील फर्निचर आणि त्याकरिता लागणारे साहित्य जळून खाक झाले आहे. दरम्यान ही आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

Read Also :

 

Get real time updates directly on you device, subscribe now.