नात्याला काळीमा फासणारे कृत्य: नऊ वर्षाच्या मुलीवर बापानेच केला बलात्कार

डोंबिवली: डोंबिवलीत बाप-लेकीच्या नात्याला कलंक लावणारा प्रकार घडला आहे. बापानेच आपल्या अल्पवयीन 9 वर्षीय पोटच्या मुलीवर बलात्कार केला आहे. नराधम बापाला पोलिसांनी अटक केली आहे. पीडितेची आई गावावरुन परत आल्यानंतर तिने हा सर्व प्रकार आईला सांगितला. आईने हा सर्व प्रकार ऐकल्यानंतर तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिने तातडीने विष्णूनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिथे तिने पोलिसांना तक्रार केली.

या घटनेमुळे संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच आरोपी बाप इतकं विचित्र आणि संतापजनक कृत्य कसा करु शकतो? असा सवाल काही स्थानिकांकडून उपस्थित केला जातोय. विशेष म्हणजे आरोपी आठ महिन्याच्या त्याच्या पोटच्या लेकीला दारु पाजवायचा, असा देखील एक संतापजनक प्रकार समोर आलाय.  तसेच डोंबिवलीत गेल्या महिन्यात एका अल्पवयीन मुलीवर 30 पेक्षा जास्त नराधमांनी अत्याचार केल्याची घटना ताजी असताना हा असा प्रकार समोर येणं म्हणजे चिंताजनक आहे, असं मत सर्वसामान्यांकडून व्यक्त केलं जातंय.

मिळालेल्यामाहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या आई-वडिलांसह डोंबिवलीत राहते. पीडितेची आई काही कामानिमित्ताने गावी गेली होती. याच गोष्टीची संधी साधून वासनांध बापाने तिच्याशी लगट करत लैंगिक अत्याचार केला. पीडितेने त्याला प्रतिकार केला असता आरोपी बापाने तिला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ, मारहाण केली.

तसेच तिला धमकी देखील दिली. पीडितेची आई गावावरुन परत आल्यानंतर तिने हा सर्व प्रकार आईला सांगितला. आईने हा सर्व प्रकार ऐकल्यानंतर तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिने तातडीने विष्णूनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिथे तिने पोलिसांना तक्रार केली. पोलिसांनी संबंधित प्रकरणाला गांभीर्याने घेत नराधम बापाला बेड्या ठोकल्या. तसेच पोलिसांनी आरोपी बापाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Read Also :

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!