धक्कादायक: वैद्यकीय महाविद्यालयात शिकाऊ डॉक्टरची हत्या

यवतमाळ: यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये शिकाऊ डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.  त्याचे नाव डॉ. अशोक पाल असे आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरातच ही हत्या करण्यात आलीय. बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली असून हत्येचे नेमके कारण काय हे अद्याप अद्याप समजू शकलेले नाही.

यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डॉ. अशोक पाल मागील काही दिवसांपासून शिकाऊ डॉक्टर म्हणून काम करत होते. मात्र बुधवारी मध्यरात्री त्यांची अमानुषपणे हत्या झाली. ही हत्या अज्ञात व्यक्तीने केली असून शिकाऊ डॉक्टरचा मृतदेह महाविद्यालयाच्या परिसरातच आढळला. या घटनेची माहिती होताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी पंचनामा केला असून तपास सुरु केलाय.

शिकाऊ डॉक्टरची हत्या का झाली हे अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान, हत्या प्रकरणानंतर रुग्णालय परिसरात विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. त्यांनी महाविद्यालय प्रशासन व डीनविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केलं असून राज्यत एकच खळबळ उडाली आहे. तसेच डॉक्टरांच्या सुरक्षेवर प्रश्न विचारला जात आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!