ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे वयाच्या 67 व्या वर्षी निधन

मुंबई: ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन झाले आहे. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात  अखेरचा श्वास घेतला. त्यांची मुलगी आणि अभिनेत्री मल्लिका दुआ यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या (रविवारी) दुपारी 12 वाजता लोधी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मल्लिका दुआ  यांनी वडिलांचा फोटो शेअर करत लिहिले “आमचे निडर आणि असाधारण वडील विनोद दुआ यांचे निधन झाले आहे. ते एक अद्वितीय आयुष्य जगले. दिल्लीच्या शरणार्थी वसाहतीतून 42 वर्षे पत्रकारितेच्या उत्कृष्टतेच्या शिखरावर पोहोचवताना ते नेहमीच सत्य बोलले. ते आता आमच्या आई, त्याची लाडकी पत्नी चिन्नासोबत स्वर्गात आहे. तिथे ते एकमेकांसाठी गाणे, स्वयंपाक करणे, प्रवास करणे सुरू ठेवतील”. विनोद दुआ यांना कोविडनंतरच्या आजारांमुळे गंभीर झाल्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. यादरम्यान त्यांची मुलगी मल्लिका दुआने त्यांची प्रकृती ठीक नसल्याचे सांगितले होते.

कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांची प्रकृती सातत्याने खालावत चालली होती. त्यांना काही दिवसांपूर्वी यकृताच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. विनोद दुआ हे हिंदी पत्रकारितेतील एक प्रसिद्ध चेहरा होते. गेल्या 5 दिवसांपासून ते अपोलो हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल होते. दुआ यांच्या पश्चात दोन मुली आहेत. दुआ यांच्या पत्नीचा या वर्षी जूनमध्ये कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला होता. दुआंनी देखील कोरोनाशी लढा दिला होता आणि तेव्हापासून त्याचे शरीर अधिकाधिक कमकुवत होत गेले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!