यूपीसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर, 10 फेब्रुवारीपासून मतदान, 10 मार्चला निकाल

5

मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने देशात पाच राज्यांच्या निवडणूकांच्या वेळापत्रकाची घोषणा आज केली. त्यानुसार मोठ्या अशा उत्तर प्रदेश राज्यात सात टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. तर उर्वरीत राज्यांमध्ये मणीपूरमध्ये दोन टप्प्यात तर पंजाब, उत्तराखंड आणि गोवा या राज्यात एका टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे.

१४ जानेवारीपासून पहिल्या टप्प्याला सुरूवात होत आहे. या निवडणुकांसाठीची मतमोजणी आणि निकाल हा १० मार्चला जाहीर होणार आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणीपूर, गोवा या पाच राज्यांमध्ये ६९० जागांसाठी कोरोनाचे नियमांचे पालन करत ही निवडणूक प्रक्रिया पार पडेल, असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले. कोरोना काळात निवडणूका घेणे आव्हान असल्याचेही निवडणूक आयोगाने यावेळी स्पष्ट केले.

या पाच राज्यांच्या निवडणूकांच्या निमित्ताने २४.९ लाख पहिल्यांदा मतदान करणारे मतदार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. या पाच राज्यांमध्ये २ लाख १५ हजार ३३८ मतदान केंद्रावर ही निवडणूक प्रक्रिया पार पडेल. त्यामध्ये 1620 मतदार केंद्रावर महिला कर्मचारी असणार आहेत. तर १ लाख पोलिंग स्टेशन वेबकास्टिंगच्या माध्यमातून कार्यरत असतील. मतदान केंद्रावर सॅनिटायझेशन आणि मास्कची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच मतदारांच्या अनुषंगाने सुविधा एप राजकीय पक्षांसाठी, पीडब्ल्यूडी एप, सी व्हिजिल एप यासारख्या सुविधा मतदान प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

कोरोनाच्या काळात मतदान घेण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन डोस देऊन लसीकरण पूर्ण झालेले असावेत असे आयोगाने स्पष्ट केले आहे. या कर्मचारी आणि अधिकारी वर्गाला फ्रंटलाईन वर्कर म्हणून गणले जाईल. तसेच निवडणूक काळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बुस्टर डोसही देण्यात येणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.