उत्पल पर्रिकरांचा भाजपाने केलेला अपमान गोव्याची जनता विसरणार नाही – संजय राऊत

7

पणजी: गोवा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांच्या उमेदवारी याद्या जाहीर झाल्यानंतर आता राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. उत्पल पर्रिकर यांनी पणजीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची घोषणा केल्यानंतर आता भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अशातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्पल पर्रिकरांचा भाजपाने केलेला अपमान गोव्याची जनता विसरणार नाही असं म्हणत भाजपावर निशाणा साधला आहे.

पणजीत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी विविध मुद्द्यांवर रोखठोक प्रतिक्रिया व्यक्त केली. उत्पल पर्रिकर यांची वेदना समजून घेऊ शकतो. ज्या पक्षात त्यांचा जन्म झाला, तो पक्ष सोडताना किंवा त्या पक्षापासून दूर जाताना कशा वेदना होतात, हे त्यांच्या चेहऱ्यावर अनुभवलेले आहे. नक्कीच आमच्या सगळ्यांच्या त्याना शुभेच्छा आहेत, असे संजय राऊत म्हणाले.

उत्पल पर्रिकर हे अपक्ष लढताय ही चांगली गोष्ट आहे. भाजपाने हे त्यांच्यावर थोपवले आहे. मनोहर पर्रिकर हे गोव्याचे एक असे नेते होते, ज्यांनी गोव्याचे नाव देशभरात उंचावले होते. राजकीय चारित्र्य कसे असले पाहिजे हे त्यांनी दाखवून दिले होतं. परंतु त्यांच्या मुलाला ज्या पद्धतीने गोव्यात, देशाच्या राजकारणात अपमानित केले गेले. हे गोवाच्या जनतेला पटलेले नाही.

आता उत्पल पर्रिकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली आहे आता लढाई होईल बेईमान विरुद्ध चारित्र्य. उत्पल यांच्यासमोर पणजीत, भाजपने अशा व्यक्तीला उमेदवार बनवले आहे, ज्याच्यावर भ्रष्टाचार, माफियागिरी, बलात्कार, असे सगळेच आरोप त्याच्यावर आहेत. आश्चर्याची बाब आहे, पंतप्रधान मोदी, अमित शाह येतील प्रचाराला. देवेंद्र फडणवीस तर तिथेच बसलेले आहेत. मग आता उत्पल पर्रिकर आणि हे सगळेजण असा सामना होईल, असे संजय राऊत म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.