उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला अर्थसंकल्प पूर्व आढावा

मुंबई : उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस हे आर्थिक वर्ष २०२३-२४ चा राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यासंदर्भात विविध विभागांच्या मागण्यांची तरतूद व पूर्ण केलेल्या कामांचा त्यांनी आज आढावा घेतला. यावेळी पुढील वार्षिक योजनांच्या मागण्यासंदर्भात त्यांनी विस्तृत चर्चा केली. विभागाच्या नाविन्यपूर्ण व महत्त्वाच्या योजना पूर्ण करण्याच्या अनुषंगाने त्यांनी संबंधितांना सूचना केल्या.

 

वार्षिक योजना सन २०२३-२४ ची आखणी संदर्भात मंत्रालयीन विभागस्तरीय बैठकीचे आयोजन सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले होते. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, ग्रामविकास व पंचायत राज, क्रीडा व युवक कल्याण, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये, अन्न व औषध प्रशासन, फलोत्पादन, रोजगार हमी योजना, राज्य उत्पादन शुल्क, इतर मागास बहुजन कल्याण, सहकार, महिला व बालविकास, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता तसेच पर्यटन या विभागांच्या कामाचा व मागण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा घेतला.

 

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास व पंचायत राज, क्रीडा व युवक कल्याण, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, फलोत्पादन व रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे, महिला व बालविकास, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, सहकार, इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री अतुल सावे यांच्यासह राज्य उत्पादन शुल्क, नियोजन  आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!