अमरावती पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे विजयी

6
विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर पाच मतदारसंघातील निवडणुकीपैकी अमरावतीचा निकाल अखेर समोर आला आहे. या पाच मतदारसंघातील निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे.

नागपूर आणि औरंगाबाद येथील जागा महाविकास आघाडीकडे गेल्या आहेत. तर अमरावती येथील निकाल लांबला होता. तो निकाल खेर महाविकास आघाडीच्याच बाजूने लागला. धीरज लिंगाडे हे विजयी झाले आहेत. भाजपचे रणजित पाटील यांचा पराभव झाला आहे. कोटा पूर्ण केला नाही पण मते अधिक असल्याने धीरज लिंगाडे हे विजयी झाले आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांनी लिंगाडे यांच्या विजयाची घोषणा केली आहे.
लिंगाडे यांना ४६ हजार ३४४ मते मिळाली आहेत तर रणजित पाटील यांना ४२ हजार ९६२ मते मिळाली आहेत. लढाई अत्यंत चुरशीची झाली. रणजित पाटील यांच्या पराभवामुळे भाजपाला एक मोठा धक्का मानावा लागेल. विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा ४७ हजार १०१ इतका निश्चित करण्यात आला होता. धीरज लिंगाडे हे कोटा पूर्ण करू शकले नाही, पण सर्वाधिक मते प्राप्त करून ते विजयी ठरले आहेत.

 

पदवीधर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यांनतर फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी धीरज लिंगाडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. जुनी पेन्शन योजना, बेरोजगारांचे प्रश्न यावर धीरज लिंगाडे यांना मतदानन खेचून आणण्यात यश आले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.