ठाणे शहरातील पायाभूत सुविधांमध्ये दिवसेंदिवस भर पडत असून हे शहर एक सुंदर आणि सुनियोजित शहर म्हणून नावारूपाला आणण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

23
एमसीएचआय – क्रेडाई, ठाणे आणि ठाणे इस्टेट एजंट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे शहरातील रेमंड मैदानावर आयोजित गृह प्रकल्पांच्या प्रदर्शनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन या प्रदर्शनाची पाहणी केली. यावेळी शिंदे याची ठाणे शहरातील बांधकाम व्यावसायिकांशी संवाद साधला.
यावेळी बोलणं मुख्यमंत्री म्हणाले कि, ठाणे शहरातील पायाभूत सुविधांमध्ये दिवसेंदिवस भर पडत असून हे शहर एक सुंदर आणि सुनियोजित शहर म्हणून नावारूपाला आणण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी सध्या ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात सुशोभीकरण करण्याची कामे सुरू असून त्यासोबतच मेट्रो आणि पुलांची कामे प्रगतीपथावर आहेत. येत्या काही वर्षात मुंबई आणि उपनगरातील ३७० किलोमीटर लांबीचे हे मेट्रोचे जाळे पूर्ण झाल्यावर रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी होईल. ठाणे येथून बोरिवलीला जाण्यासाठी टनेलमार्ग तयार करण्यात येणार असून त्याद्वारे हे अंतर अवघ्या १० ते १५ मिनिटांमध्ये कापता येईल. याशिवाय फ्रिवे ठाणे शहरापर्यंत आणणे, साकेत ते गायमुख कोस्टल रोड तयार करणे, घोडबंदर रोडवरून ३ खाडी पुलांद्वारे भिवंडीची गावे ठाण्याशी जोडणे अशी अनेक कामे होत असल्याने बांधकाम क्षेत्राला त्याचा मोठा फायदा होणार असल्याचे याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
त्यासोबतच कोरोना काळात बांधकाम क्षेत्राला बसलेला फटक्यातून हे क्षेत्र सावरण्याची स्टॅम्प ड्युटी आणि प्रीमियम मधून सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता, त्याचाही मोठा फायदा बांधकाम व्यावसायिक आणि त्यानंतर थेट ग्राहकाला मिळाल्याचे यासमयी बोलताना नमूद केले. या प्रदर्शनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘डेस्टिनेशन ठाणे’ या परिसंवादाचे यावेळी उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रताप सरनाईक, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास, एमसीएचआयचे अध्यक्ष जितेंद्र मेहता, बांधकाम व्यावसायिक अजय अशर, क्रेडाईचे दीपक गरोडिया, राजू व्होरा, रेमंडचे संदीप महेश्वरी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.