चिंचवड पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटेंना उमेदवारी

23

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पिंपरी चिंचवड जागेवर पोटनिवडणूक  होणार आहे. हि पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपने प्रयन्त केला आहे. परंतु महाविकास आघाडीने हि निवडणूक लढण्याची तयारी मात्र सुरु केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने नाना काटे यांनी उमेदवारी जाहीर केली आहे.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची तयारी आता सुरु झाली आहे. भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आज राष्ट्रवादीने देखील आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. नाना काटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महाविकास आघाडीतर्फे या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे.
जयंत पाटील यांनी ट्विट करत माहिती दिली कि, चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाना काटे हे उमेदवार असतील. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र काम करून या निवडणुकीत आम्ही नक्कीच विजयी होऊ, असा आम्हाला विश्वास आहे., असे ट्विट मध्ये म्हटले आहे.
नाना काटे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली कि, लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने सहानुभूती व्यक्त केली. सहानुभूती आणि राजकारण या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. अजित पवार यांनी ज्या प्रकारे चिंचवड विकास केला आहे. त्याच मुद्द्यावरून आम्ही या निवडणुकीला पुढे जाऊ असे ते म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.