चिंचवडमध्ये जागतिक दर्जाचे ग्रंथालय उभारावे, माजी उपमहापौर तुषार हिंगे आयुक्तांकडे मागणी

103

 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात चिंचवड येथील एम्पायर इस्टेट उड्डाण पुलाजवळील बांधकाम परवानगी दिलेल्या जागेत सुविधा भूखंडावर जागतिक दर्जाचे ग्रंथालय उभारावे, अशी मागणी माजी उपमहापौर तुषार हिंगे यांनी आयुक्तांकडे केली आहे.या संदर्भात हिंगे यांनी नुकतेच महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे.

सदर महापालिकेची जागा पुणे-मुंबई महामार्गावरील निगडी दापोडी व काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रस्त्यालगत असून पिंपरी चिंचवड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. अनेक वर्षांपासून शहरात जागतिक दर्जाचे ग्रंथालय उभारण्याची मागणी करण्यात येत असून हा प्रकल्प राबविणेबाबत प्रशासकीय वारंवार स्तरावर चर्चा देखील झालेली आहे पण अद्याप त्यावर कोणतेही नियोजन झाले नाही. हिंगे निवेदनात म्हणतात कि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मंजूर विकास योजनेतील चिंचवड येथील स. न. २२७ / १ येथे बांधकाम परवानगी दिलेल्या जागेत सुविधा भूखंड २३२३ चौ. मी. व आरक्षण क्र. १८५ ची जागा असून सुमारे १२०० चौ. मी. आहे.

या ठिकाणी एकूण ३५०० चौ. मी. जागा उपलब्ध आहे. सदर भुखंडापासून पासून काही अंतरावर सायन्स पार्क, तारांगण, ऑटो क्लस्टर शहरातील महत्त्वकांक्षी प्रकल्प आहेत तसेच महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारत देखील काही अंतरावरच आहे. यावरून सदर ठिकाणी जागतिक दर्जाचे ग्रंथालय उभारणे अतिशय योग्य ठरेल. ग्रंथालयाबाबत नियोजन बैठक व्हावी या जागेत संबधित विकसक किंवा पालिका प्रशासनामार्फत जागतिक दर्जाचे ग्रंथालय उभारण्याचे नियोजन केले जावे आणि ते करत असताना किंवा याबाबत कोणताही निर्णय घेत असताना स्थानिक लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक व विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींशी बैठक घेऊन चर्चा करावी ज्यामुळे हा महत्वकांक्षी प्रकल्प राबविण्यास त्यांची मदत होईल,अशी मागणी हिंगे यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.

Tushar Hinge

Get real time updates directly on you device, subscribe now.