पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दोन वंदे भारत ट्रेन्सचं लोकार्पण… मोदींची भाषणाला मराठीतून सुरुवात

आज मुंबई ते साईनगर शिर्डी वंदेभारत एक्सप्रेसचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यामुळे मुंबईला त्र्यंबकेश्वर आणि साईनगर शिर्डी या तीर्थक्षेत्रांशी जोडले जाणार आहे. आज वंदे भारत नववी आणि दहावी वाहने भारत ट्रेन समर्पित करताना मला खूप आनंद होत आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीं यावेळी म्हटले.  आपल्या भाषणाची सुरुवात मराठतून करत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली.

 
नरेंद्र मोदी यांनी म्हटले कि, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणीन इथे जमलेले सगळेच लोक या सगळ्यांना मी सांगू इच्छितो कि आजचा दिवस भारतीय रेल्वेसाठी आणि मुंबईसाठी खूप मोठा आहे. आज पहिल्यांदाच दोन वंदे भारत ट्रेन्स एकत्र सुरु झाल्या आहेत. मुंबई आणि पुणे या दोन आर्थिक केंद्रांना धर्माच्या केंद्रांशी जोडणार आहेत, असे मोदी यांनी म्हटले.
महाराष्ट्रात पर्यटन आणि तीर्थयात्रा यांना प्रोत्साहन देणाऱ्या ट्रेन आहेत. शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन , नाशिक, त्र्यंबकेश्वर या सगळ्या ठिकाणी भेट देणं भारतमुळे सुकर आणि सुखकर होणार आहे. सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारतमुळे आई तुळजाभवानी , अक्कलकोटचे स्वामी समर्थ, पंढरपूर या ठिकाणी जाणं सोपं होणार आहे. मुंबई आणि महाराष्ट्राच्या जनतेला मी आज शुभेच्छा देतो असे मोदी यांनी म्हटले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!