12 स्मार्ट औद्योगिक शहरांमध्ये महाराष्ट्रातील दिघीचा समावेश केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचे मनःपूर्वक आभार – चंद्रकांत पाटील

41

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने एक पथदर्शी निर्णय घेतला आहे. ज्या अंतर्गत देशभरात नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत 12 स्मार्ट औद्योगिक शहरांच्या निर्मितीला मंजुरी देण्यात आली आहे. या बारा शहरांमध्ये महाराष्ट्रातील दिघीचा समावेश करण्यात आला आहे.यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नरेंद्र मोदीजी आणि त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचे मनःपूर्वक आभार मानले.

चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, विकसीत भारत हे मोदी सरकारचे ध्येय राहिले आहे. प्रत्येक वर्षी अगणित कल्याणकारी योजना राबवून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार त्या दिशेने योजनाबद्ध वाटचाल करीत आहे. याच धर्तीवर मोदीजींच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने एक पथदर्शी निर्णय घेतला आहे. ज्या अंतर्गत देशभरात नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत 12 स्मार्ट औद्योगिक शहरांच्या निर्मितीला मंजुरी देण्यात आली आहे. या बारा शहरांमध्ये महाराष्ट्रातील दिघीचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण बाब आहे. या शहराच्या निर्मितीसाठी 28 हजार 600 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून दहा लाख प्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. स्मार्ट औद्योगिक शहरांच्या या योजनेत महाराष्ट्राच्या दिघीचा समावेश केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचे पाटील यांनी मनःपूर्वक आभार मानले.

Get real time updates directly on you device, subscribe now.