राज्यातील अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय, चंद्रकांत पाटील यांची माहिती

4

अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी यांच्या संपाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. या बैठकीत राज्यातील अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आले, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चंद्रकांत पाटील यांनी आभार मानले.

या बैठकीत घेण्यात आलेले काही महत्त्वाचे निर्णय चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. आश्वासित प्रगती योजनेचा लाभ कायम ठेवण्याबाबत यावेळी सकारात्मक निर्णय घेण्यात आला. अकृषी विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारित वेतनश्रेणीनुसार 58 महिन्यांची थकबाकी देण्याबाबत अनुकूलता तसेच विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षेकतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे लवकरच भरण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

या बैठकीला वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्चशिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, महाराष्ट्र अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.