पुण्यातील मोठे बांधकाम व्यवसायिक आहेत तसंच ते शरद पवारांचे निकटवर्तीय अनिरुद्ध देशपांडे यांच्या घरावर आयकर विभागाची धाड

5

पुण्यात आयकर विभागाने जवळपास आठ ठिकाणी छापेमारी केली आहे. पुण्यातील बडे उद्योजक असलेले सिटी ग्रुपचे चेअरमन अमनोरा पार्कचे सर्वेसर्वा अनिरुद्ध देशपांडे यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापा टाकण्यात आला आहे. अनिरुद्ध देशपांडे हे शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात.

अनिरुद्ध देशपांडे यांच्या घरावर आणि कार्यलयावर आज सकाळी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. एकूण आठ ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकले आहेत. आज सकाळीच हि कारवाई सुरु झाली असून अदयाप झाडाझडती सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
अनिरुद्ध देशपांडे यांच्या कार्यालयासह घर आणि इतर ठिकाणी शोधमोहीम सुरु आहे. आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या संशयातून हि तपासणी करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. देशपांडे यांचे  राजकीय वर्तुळात अनेकांशी चांगले संबंध आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे शरद पवार यांचे ते निकटवर्तिय मानले जातात. त्यामुळे आयकर विभागाने मंगळवारी बीबीसी वृत्तसंस्थेच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यलयांमध्ये सर्वेक्षण केले होते. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली होती. आज आयकर विभागाकडून पुण्यात छापे टाकण्यात आले आहेत. या धाडसत्रातून काय निष्पन्न होणार ते पाहावे लागेल.

Get real time updates directly on you device, subscribe now.