कसबा निडणुकीतील यशाचं सूत्र काय हे खरतर रवींद्र धंगेकर यांनीच सांगितलं पाहिजे – शरद पवार

आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत कसबा आणि चिंचवड निवडणुकीवर भाष्य केले. गिरीश बापट यांचं वैशिट्य म्हणजे त्यांचे भाजप आणि त्यांच्या परिवाराशी त्यांचे घनिष्ट संबंध होते, मात्र पुण्यातील भाजप सोडून इतर सर्वांशीही त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते.  साहजिकपणे ज्या मतदारसंघात त्यांचे लक्ष केंद्रित होते तो मतदारसंघ हा आपल्याला जड जाईल असं आम्हाला वाटलं होत, असे पवार म्हणाले.

गिरीश बापट यांच्या सल्ल्याने निर्णय घेतले कि नाही याबाबत ऐकायला मिळाली याचा अर्थ गिरीश बापट आणि टिळकांना डावलून काही निर्णय घेतले, तर त्याचे काय परिणाम होतील अशी एक चर्चा होती. कदाचित त्याचा फायदा होईल , अशी शंका होती, असे पवार म्हणाले. परंतु निवडणूक झाल्यावर जी व्यक्ती निवडून आली ती व्यक्ती वर्षानुवर्षे कशाचीही अपेक्षा न करता लोकांमध्ये काम करणारी होती. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा असा उमेदवार आहे जो कधी चारचाकी गाडीत बसत नाही. दोन चाकी गाडीवर फिरतो.
पवार पुढे म्हणाले कि, कसबा निडणुकीतील यशाचं सूत्र काय हे खरतर रवींद्र धंगेकर यांनीच सांगितलं पाहिजे . धंगेकरांना यश मिळालं असं सामान्य लोकांकडून ऐकायला मिळत होत, पण मला स्वतःला खात्री नवहती, त्याच मुख्य करणं म्हंणजे नारायण, सदाशिव आणि शनिवार पेठ , असे पवार याची म्हटले.