‘शरद पवार यांचा तुमच्यावरच काय तर तुमच्या वरच्या नेत्यांवर देखील विश्वास नाही’, चंद्रकांत पाटील यांचा प्रशांत जगताप यांना टोला
पुणे : कसबा आणि चिंचवड निवडणुकीची भाजपकडून जोरदार तयारी सुरु आहे. भाजपने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. या निडणुकीबाबत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली . यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, धंगेकर आणि रासने अशी हि निवडणूक नाही तर विधानसभेची निवडणूक आहे. त्या विधानसभेमध्ये राज्याचे कायदे तयार होतात. राज्याच्या पॉलिसी ठरतात, त्यामुळे हि निवडणूक भाजप विरुद्ध काँग्रेस अशी आहे. महाविकास आघाडीने काँगेसला वाऱ्यावर सोडलेले दिसत आहे. यापूर्वीही त्यांची सत्ता होती तेव्हाही काँग्रेसचा काही रोल नव्हता, बाकीचे दोन जणं सत्ता चालवायचे. त्यामुळे हि निवडणूक भाजप विरुद्ध काँग्रेस अशी आहे.