ताई महाराष्ट्रातील सोसायट्या, कारखाने कुणी चाटून पुसून खाल्ले? परत विकत घेतले? किती राष्ट्रवादीचे नेते यांत सहभागी आहेत?, केशव उपाध्येंचे टीकास्त्र

भाजपाच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही ठेवायचं नाही असं ठरवलंय काय? अगोदर महाराष्ट्राच्या वाट्याचे उद्योग आणि रोजगार पळविले आणि आता चक्क आमचा सांस्कृतिक व अध्यात्मिक वारसा पळविण्याचा घाट घातलाय….!शी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. महाराष्ट्रातील भीमाशंकर ज्योतिर्लिंग खरं नसल्याचं आसाम सरकारने म्हटलं आहे. एवढंच नाही तर सहावं ज्योतिर्लिंग आसाममध्ये असल्याचा दावा देखील आसाम सरकार केला आहे. यावरूनचं सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. सुप्रिया सुळे यांच्या या टीकेला भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

केशव उपाध्ये यांनी ट्विट करत म्हटले कि, ताई महाराष्ट्रातील सोसायट्या, कारखाने कुणी चाटून पुसून खाल्ले? परत विकत घेतले? किती राष्ट्रवादीचे नेते यांत सहभागी आहेत? या सरकारमध्ये एक उद्योग गेला हे दाखवा? थोडी जबाबदारीची अपेक्षा ठेऊ शकतो ना महाराष्ट्र आपल्याकडून? मविआ सरकार असतानाच महाराष्ट्रातील उद्योग गेले, असे जोरदार प्रत्युत्तर उपाध्ये यांनी दिले आहे.

 

सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे कि, त्यांनी राज्याच्या सांस्कृतिक आणि  आध्यत्मिक वारसा जपण्यासाठी या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी. याबाबत आपली हरकत नोंदवावी असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!