मेट्रो, जुन्या वाड्यांचे प्रश्न, गुंठेवारी सारखे महत्त्वाचे विषय मार्गी लावण्यासाठी, भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांना विजयी करा – चंद्रकांत पाटील

पुणे : मेट्रो, जुन्या वाड्यांचे प्रश्न, गुंठेवारी सारखे महत्त्वाचे विषय मार्गी लावण्यासाठी २०० आमदारांचे पाठबळ असणाऱ्या भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांना विजयी करा असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. ते पाठपुरावा करून सर्व प्रश्न मार्गी लावून कसब्याचा विकास करू शकतील असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
भारतीय जनता पक्ष, बाळासाहेबांची शिवसेना, आर.पी.आय. (आठवले गट), शिवसंग्राम, रा.स.प., रयत क्रांती संघटना, पतित पावन संघटना महायुतीचे कसबा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची नातूबागेच्या मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती या सभेत पाटील बोलत होते.
उमेदवार हेमंत रासने, माजी खासदार संजय काकडे ,माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, शैलेश टिळक, कुणाल टिळक, सुधाकर भालेराव सम्राट थोरात अर्चना पाटील अजय खेडेकर विष्णू कसबे शैलेंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. पाटील म्हणाले, मेट्रो, जुन्या वाड्यांचे प्रश्न, गुंठेवारी सारखे महत्त्वाचे विषय मार्गी लावण्यासाठी २०० आमदारांचे पाठबळ असणाऱ्या भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांना विजयी करा. ते पाठपुरावा करून सर्व प्रश्न मार्गी लावून कसब्याचा विकास करू शकतील