खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला मारण्यासाठी सुपारी दिल्याचा संजय राऊत यांचा गंभीर आरोप… यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली प्रतिक्रिया

खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला मारण्यासाठी सुपारी दिली आहे, असा आरोप राऊत यांनी  या पत्रात म्हटले आहे. या प्रकरणी एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. धमकी प्रकरणाचा तपास करून दोषींवर कारवाई केली जाईल , असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले.

एकनाथ शिंदे यांनीं म्हटले कि, उद्धव ठाकरे गटाचे आणि खासदार संजय राऊत यांना मिळलेल्या धमकी प्रकरणाचा तपास करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन शिंदे याची दिले. तसेच स्टंटबाजीसाठी असे आरोप करत असेल तर त्याच्यावरही कारवाई केली जाईल, असा थेट इशाराही राऊत यांना मुख्यमंत्र्यानी दिला.  शिंदे यांनी म्हटले कि, आमच्याकडे पोलिसांची एक समिती आहे जी सुरक्षेचा आढावा घेते आणि  ज्यांना जशी सुरक्षा गरजेची आहे, तशी सुरक्षा दिली जाते.

संजय राऊत यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे कि, आपल्या जीवाला धोका आहे. आपल्याला जीवे मारण्याची खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील गुन्हेगार राजा ठाकूरला सुपारी दिली आहे.  राज्यात सत्ताबदल झाल्यांनतर माझी सुरक्षाही काढण्यात आली. याबाबत माझी कोणतीही तक्रार नाही. महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती पाहता तुमच्यापर्यंत हि बाब पोहोचवणं गरजेचं होत. मला कोणतीही सुरक्षा नको, कारण मी एकटा वाघ आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!