चिंचवड मध्ये भाजपच्या अश्विनी जगताप आघाडीवर… आज साहेबांची खूप आठवण येत आहे, अश्विनी जगताप यांची प्रतिकिया

14

मागील काही दिवसांपासून कसाब आणि चिंचवड या दोन्ही ठिकाणी निवडणुकीची जय्यत तयारी सुरु होती. सर्व पक्षांकडून हि निवडणूक जिंकण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु होती. या निवडणुकीसाठी दोन्ही बाजुंनी प्रतिष्ठा पणाला लावण्यात आली आहे. आज या निवडणुकीच्या निकालाचा दिवस आहे. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपकडून उमेद्वारी  देण्यात आली आहे. आणि आता ९ फेऱ्याअंती जगताप या आघडीवर आहेत.  जवळपास ६ हजार मतांनी आघाडीवर आहेत.

अश्विनी जगताप  यांनी आघाडींनंतर प्रतिक्रिया देताना म्हटले कि, मला आज साहेबांची खूप आठवण येत आहे. पण लोकांना न्याय द्यावा , त्यांच्या पाठीवर हात फिरवणार कुणी असावं, त्यांची काम वेळच्या वेळी व्हावीत, त्यांना भक्कम आधार देणार कुणीतरी असावं यासाठी खरतर मी निवडणुकीसाठी उभी राहिले आहे. हि साहेबांनी केलेल्या कामाची पावती असल्याचे जगताप यांनी  म्हटले.
जगताप यांनी म्हटले कि, भाजपचे सर्व नगरसेवक , कार्यकर्ते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी इथे येऊन मला पाठिंबा दिला , सभा घेतल्या. भाजपचे भारतातून कार्यकर्ते आले होते. त्यांना मी धन्यवाद देईन असे जगताप यांनी म्हणाले. हि निवडणूक प्रतिष्ठेची होती. लक्ष्मण जगताप यांनी तेवढा विकास केला आहे. त्यांच्या आकस्मित जाण्यामुळे हि निवडणूक लागली. हि निवडूक बिनविरोध झाली असती तर चांगलं झालं असत असे देखील मत जगताप यांनी व्यक्त केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.