मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला… आम्ही कुणालाही घाबरत नाही, घाबरणार नाही – संदीप देशपांडे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर आज सकाळी शिवाजी पार्क येथे मॉर्निंग वॉकला गेले असताना त्यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. काही अज्ञात व्यक्तींनी स्टम्पच्या साहाय्याने देशपांडे यांना मारहाण केली. संदीप देशपांडे यांना उपचासाठी नजीकच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक उपचार करून त्यांना आता घरी सोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

संदीप देशपांडे यांनी या हल्ल्यानंतर प्रतिक्रिया दिली कि, आम्ही कुणालाही घाबरत नाही, घाबरणार नाही. असा घाबरवण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. आम्ही कुणालाही भीक घालत नाही. यामध्ये कोण लोक आहे हे सर्वांना माहिती आहे. अशा हल्ल्यानं मी घाबरणार नाही. मी माझं काम करत राहिन. ज्यांना वाटत मी या हल्ल्याने घाबरेल त्यांना मी स्पष्टपणे सांगतो कि, याने मी घाबरणार नाही, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.
शिवाजी पार्क येते मॉर्निंग वॉकला गेलेल्या संदिप देशपांडे यांच्यावर एका टोळक्याने स्टम्पच्या साहाय्याने हल्ला केला. या हल्ल्यात देशपांडे यांच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे.त्यांना ताबडतोब हिंन्दूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची तक्रार नोंदवण्यात आली असून पोलीस तपास करत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!