भाजप हे सगळं जाणीवपूर्वक करत आहे, त्यांचा विरोधकांना घाबरवण्याचा प्रयत्न सुरु आहे – नाना पटोले

7

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज पुन्हा एकदा एडीने छापा टाकला आहे. या पूर्वी जानेवारी महिन्यात छापेमारी करण्यात आली होती. मुश्रीफ यांच्या पुणे आणि कोल्हापूर मालमत्तेची ईडीच्या पथकाकडून चौकशी करण्यात आली. या कारवाईनंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. यासोबतच महाविकास आघाडीतील नेत्यांकडूनही संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. भाजप हे सगळं जाणीवपूर्वक करत असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे.

नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले कि, भाजप हे सगळं जाणीवपूर्वक करत आहे. त्यांचा विरोधकांना घाबरवण्याचा प्रयत्न सुरु आहे. आपण अनिल देशमुखांचं प्रकरण नुकतंच पाहिलं आहे. परमवीर सिंहांनी जे काही आरोप केले त्याची काही चौकशी झाली नाही.  ऐल देशमुखांवर १०० कोटी रुपयांचा आरोप केला होता. परंतु त्यांना या प्रकरणात कोणतेही पुरावे सापडले नाहीत. एका निरपराध माणसाला दीड वर्ष तुरुंगात राहावं लागलं. त्यांच्यावर जे काही आरोप झाले त्यापैकी एकाही प्रकरणात ईडी किंवा सीबीआयकडून कारवाई झालेली नाही. परंतु अशा कारवाईनंतर जे लोक भाजपमध्ये गेले ते स्वच्छ झाले. या लोकांची पुहा चौकशी का झाली  नाही ? असा सवाल पटोले  यांनी  उपस्थित केला.

नागपुरात भाजपचे अनेक नेते आहेत ज्यांच्याकडे साधी स्कुटर नव्हती , त्याच्याकडे आता हेलिकॉप्टर आहे. या नेत्यांना आता मोठमोठे बंगले बांधले आहेत. फार्महाउस बांधले आहेत. हे पैसे कुठून आणले? असा सवालही पटोले यांनी उपस्थित केला.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.