चांगू काना ठाकूर स्वायत्त महाविद्यालयाने घेतलेली भरारी विद्यापीठाकडे वाटचाल करीत आहे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

3

पनवेल  : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी  जनार्दन भरत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स व विज्ञान महाविद्यालयाच्या रौप्यमहोत्सव समारंभ वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.  देशाच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून व्यवसायाभिमुख शिक्षण महत्वाचे ठरणार असून शिक्षणासोबत सामाजिक जाणीव असलेल्या चांगू काना ठाकूर स्वायत्त महाविद्यालयाने घेतलेली भरारी विद्यापीठाकडे वाटचाल करीत असल्याचे  चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटले.

चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कि, लोकनेते रामशेठ ठाकूर गरीब परिस्थितीतून सातारा येथे कर्मवीरांच्या भूमीत शिकले. त्यांना कर्मवीर अण्णांचा सहवास लाभला आणि त्यांचे दातृत्व लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अंगिकारले. देणार्‍याने देत रहावे आणि घेणार्‍याने घेत राहावे म्हणजे दान करण्याची वृत्ती घेत जावे आणि ती देण्याची वृत्ती आहे म्हणूनच लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून दातृत्वाचे धाडस होत आहे असे सांगतानाच हे सीकेटी महाविद्यालय विद्यापीठ होण्याच्या मार्गावर असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
यावेळी महाविद्यालयचे चेअरमन माजी खासदार रामशेठ ठाकूर,आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी,आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे ,जनार्दन भरत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत,उपाध्यक्ष वाय. टी. देशमुख, महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी इतर मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.