चंद्रकांत पाटील यांची शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटलांच्या सट्टाबाजी या वक्तव्यावर प्रतिक्रिया,  गुलाबराव पाटील यांच्यासारखी माणसं…..

मावळ : पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी असे विधान केले कि,  आम्ही मंत्रिपदाचा सट्टा लावून एकनाथ शिंदेंबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. गुलाबराव पाटील यांच्या या विधानावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागली आहे. अनेक  तर्कवितर्क करण्यात येत आहेत. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी या विधानाबाबत विचारणा केली असता आपली भूमिका स्पष्ट केली.

रविवारी मावळ येथील कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कि, गुलाबराव पाटील यांच्यासारखी माणसं ग्रामीण भागात वाढली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात ज्या भाषेत बोलतात त्या भाषेत ते बोलले. शहरी भागात जरा पॉलिश करून बोलतात. जसं कि, आम्ही रिस्क घेतली. त्या रिस्कला गुलाबराव पाटील आम्ही सट्टा खेळलो असे म्हटले, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

मनसे – भाजप युतीवर देखील माध्यमांनी सवाल उपस्थित केल्यावर चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले कि असा कोणताही प्रस्ताव अद्याप नाही.  पण राजकारणामध्ये हि गोष्ट कधी घडेल याचा काही भरवसा नसतो. पण आज तर आ कुठलाही विषय नसल्याचे चंद्रकांत पाटील यावेळी  म्हणाले.