समाजाप्रती निष्ठा असणारा युवा वर्ग तयार करण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून होत आहे – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शतकमहोत्सव वर्षानिमित्त प्रेरणा व्यक्तिमत्त्व विकास राज्यस्तरीय शिबिराचे ऑनलाइन उद्घाटन सोमवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. यामध्ये राज्याच्या विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे निवडक विद्यार्थी सहभागी होते. हे शिबीर १३-१७ मार्च दरम्यान होणार आहे. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, कुलगुरू डॉ. संजय दुधे, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सोपानदेव पिसे, राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी व उच्च तंत्रशिक्षण विभागाचे विशेष कार्यअधिकारी डॉ. रामेश्वर कोठावळे उपस्थित होते.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले कि, देशाचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी जे नेतृत्च लागते ते तयार करण्याची जबाबदारी राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत करण्यात येते. या योजनेच्या स्वयंसेवकांचे राष्ट्राच्या विकासात मोठे योगदान आहे. त्यासाठी स्वयंसेवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करुन नेतृत्व गुणांचा विकास गरजेचे आहे, असे प्रतिपादन चंद्रकांत पाटील यांनी केले.

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले कि , जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता आजच्या युवकांमध्ये आहे. भारतात कौशल्य धारण केलेले सर्वाधिक गुणी विद्यार्थी आहेत. समाजाप्रती निष्ठा असणारा युवा वर्ग तयार करण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून होत आहे. युवकांनी पर्यावरण, कौशल्य विकास, ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा सुधारणे यासारख्या विषयांवर काम करण्याची गरज आहे असे ते म्हणाले. प्रशासनाच्या बरोबरीने राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून काम व्हावे यासाठी संख्या वाढविणे निधी उपलब्ध करून देणे यासारखे सर्व सकारात्मक सहकार्य करण्याची ग्वाही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!