हतबल शेतकरी ते समृद्ध शेतकरी हे शक्य झाले ते केवळ ‘नमो’ सरकारच्या यशस्वी योजनांमुळेच – चंद्रकांत पाटील

मुंबई : गेली कित्येक वर्षे निराश व निराधार योजनांमुळे देशातील शेतकरी विकासापासून दूर होता परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अथक प्रयत्नांमुळे आज देशातील शेतकऱ्यांचा विकास स्पष्ट दिसत आहे, असे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. हतबल शेतकरी ते समृद्ध शेतकरी हे शक्य झाले ते केवळ ‘नमो’ सरकारच्या यशस्वी योजनांमुळेच असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
नरेंद्र मोदी यांचे सरकार येण्यापूर्वी शेतकऱ्यांची भयानक परिस्थिती होती. चंद्रकांत पाटील यांनी या मोदी सरकारच्या आधी आणि नंतर शेतकऱ्यांच्या परिस्थितीतील बदल समोर आणला आहे. त्यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.