वित्तीय त्रुटी लवकरच पूर्ण करू – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

5

मुंबई  : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत निवेदन देताना  प्रलंबित असलेल्या वित्तीय त्रुटी यावर भाष्य केले.  प्रलंबित असलेल्या वित्तीय त्रुटी लवकरच पूर्ण केल्या जातील, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले कि, मी तुम्हाला शब्द देतो कि १५ एप्रिल पर्यंत खात्याच्या सगळ्या त्रुटी पूर्ण होतील. कॉर्पोरेटमध्ये बिल उशिरा देण्यासाठी एक माणूस असतो त्याने काही ना काही कारणाने बिल लांबवायचं. त्याकाळातील व्याज जे वाचत त्यात त्याची सॅलरी होते. फायनान्स मध्ये असेच आहे कि करायचं आहे पण हि त्रुटी , ती त्रुटी जेवढं लांबवता येईल तेवढं लांबवू . १५ एप्रिल ते ३० एप्रिल रोज फाईल बघून फायनान्शियल त्रुटी दूर करू. 
राज्याच्या साईजच्या तुलनेने हा भार  ७९ कोटी इतकाच आहे. ३० एप्रिलपर्यंत फायनान्शियल त्रुटी पूर्ण करून आता हा विषय पूर्ण करायलाच पाहिजे असे माझे  व्यक्तिशः म्हणणे आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात स्पष्ट केले. 

Get real time updates directly on you device, subscribe now.