कोल्हापूर ते ऑलिम्पिक हा स्वप्नील कुसळेचा प्रवास प्रेरणादायी!… चंद्रकांतदादा पाटील यांनी केले स्वप्नील व मार्गदर्शिका दिपाली देशपांडेंचे अभिनंदन

59

मुंबई : ” कोल्हापूर ते ऑलिम्पिक हा स्वप्नील कुसळेचा प्रवास प्रेरणादायी असून अर्जून पुरस्काराने त्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे,”अशी भावना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत.

ना.चंद्रकांतदादा यांनी पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये नेमबाजीत कांस्यपदक जिंकणारा मराठी पठ्ठया स्वप्नील कुसळे याला 2025 चा ‘अर्जुन पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल चंद्रकांत दादा पाटील यांनी अभिनंदन केले. त्याच्या मार्गदर्शक दिपाली देशपांडे यांनाही ‘द्रोणाचार्य पुरस्कार’ मिळाला आहे. त्यांचेही त्यांनी यावेळी अभिनंदन केले आहे. कोल्हापूरच्या मातीपासून ऑलिम्पिक पदकापर्यंत झालेला स्वप्निलचा प्रवास प्रत्येक तरुणासाठी आदर्शवत आहे असेही त्यांनी याठिकाणी नमूद केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.