देवेंद्र फडणवीस हे कार्यकुशल नेते, संजय राऊतांच्या पत्राला उत्तर देण्यास ते सक्षम आहेत – चंद्रकांत पाटील
पुणे : खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी सरकारमधील काही नेत्यांचा बाजार बुणगे असा उल्लेख केला आहे तसेच त्यांच्ययावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. या बाजार बुणग्यांवर काठोर कारवाई कधी करणार असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणी उच्च व ततंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील म्हणाले कि, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी हे कार्यकुशल नेते आहेत. संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे, आणि ते त्या पत्राला उत्तर देण्यास सक्षम असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस हे कधीच कोणाची भेट टाळत नाहीत. सध्याचे अधिवेशन हे खूप दिवस चाललं. इतिहासात पहिल्यांदाच इतके दिवस अधिवेशन चाललं . त्यामुळे व्यस्त शेड्युलमध्ये त्यांनी वेळ दिला नसेल. पण संजय राऊतांच्या प्रत्येक आरोपाला सिरियसली घ्यायचं नसत, असे पाटील म्हणाले. देवेंद्र फडणवीस हे सध्या प्रचंड व्यस्त आहेत. ते त्यांना वेळ देतील असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
संजय राऊत यांनी फडणवीस यांना जे पत्र पाठवलं आहे ते ट्विटरवर शेअर केले आहे. त्यांनी त्यामध्ये म्हटले आहे कि, “महाराष्ट्राचे कर्तबगार, कर्तव्य तत्पर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भ्रष्टाचार मोडून काढण्यासाठी तसेच शेतकऱ्यांची लूट थांबवण्यासाठी केलेली विनंती. बाजार बुणगे सरकारात आहेत.आपल्या सोबत आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई कधी करणारं?”, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.