पुण्यातील नवीन होत असलेल्या बोगद्यांमुळे पुणेकरांचा मोठा फायदा होणार  – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

6

पुणे : पुण्यातील नवीन होत असलेल्या बोगद्यांमुळे पुणेकरांचा मोठा फायदा होणार आहे. यामुळे पुण्यातील वाहतूकीचा प्रश्न कमी होईल, यासोबतच पुणेकरांचा वेळ वाचेल, इंधनात बचत होईल व प्रदूषण कमी होण्याससुद्धा मदत होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, सिग्नलच्या भाषेत सांगायचं झालं तर सहा सिग्नल आपण स्किप करू शकतो. स्वाभाविकपणे अंतर तर २ ते अडीच किलोमीटर कमी होईल. परंतु जेव्हा तुम्ही सिग्नल स्किप करता त्यावेळा तुमचा वेळ आहे तो त्या स्पॉटला जाण्यासाठीचा २० ते २२ मिनिटांनी कमी होतो. २० ते २२ मिनिटांनी जेव्हा तुमचा वेळ कमी होतो त्यामुळे स्वाभाविकपणे गाडीचे इंधन याची बचत होते, सोबतच प्रदूषण देखील वाचतं. यामुळे लोकांचा वेळ वाचणार आहे, इंधन वाचणार आहे, प्रदूषण वाचणार आहे, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले कि, शहरामध्ये १६ ओव्हर ब्रिजेसची रचना होते. जे फेज नुसार इम्प्लिमेंट करावे लागतील. २०२६ उजाडे पर्यंत शहरातील आधीचे प्रश्न हे सुटतील. यातून ट्रॅफिकची समस्या नक्कीच कमी होणार आहे. वेळ वाचणार आहे. त्यामुळे हे रस्ते करावे लागतील, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.