केंद्र सरकारच्या माध्यमातून संपूर्ण देशात राबविण्यात येणाऱ्या विविध लोकोपयोगी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविल्या जात आहेत – चंद्रकांत पाटील
मुंबई : भारतीय जनता पार्टीचा गुरुवारी स्थापना दिवस साजरा करण्यात आल्या. भाजपच्या सर्व नेते मंडळींनी, कार्यकर्त्यांनी विविध उपक्रम या निमित्ताने राबविले होते. भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात केंद्र सरकारच्या माध्यमातून संपूर्ण देशात राबविण्यात येणाऱ्या विविध लोकोपयोगी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविल्या जात आहेत.
गुरुवारी आयुषमान भारत कार्डचे वितरण प्रदेश कार्यालयात लाभार्थी प्रकाशजी कांबळे यांना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत केले. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर हे देखील उपस्थित होते.