केंद्र सरकारच्या माध्यमातून संपूर्ण देशात राबविण्यात येणाऱ्या विविध लोकोपयोगी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविल्या जात आहेत – चंद्रकांत पाटील

28

मुंबई : भारतीय जनता पार्टीचा गुरुवारी स्थापना दिवस साजरा करण्यात आल्या. भाजपच्या सर्व नेते मंडळींनी, कार्यकर्त्यांनी विविध उपक्रम या निमित्ताने राबविले होते.   भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात केंद्र सरकारच्या माध्यमातून संपूर्ण देशात राबविण्यात येणाऱ्या विविध लोकोपयोगी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविल्या जात आहेत.

गुरुवारी   आयुषमान भारत कार्डचे वितरण प्रदेश कार्यालयात लाभार्थी प्रकाशजी कांबळे यांना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत केले. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर हे देखील उपस्थित होते.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डाजी यांच्या सूचनेनुसार “एक बार फिर से भाजपा सरकार” उपक्रम संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे. पक्षाच्या  प्रचारासाठी भिंती रंगविण्याची मोहीम देखील  सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेचा प्रारंभ प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते गुरुवारी मुंबईत करण्यात आला. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ व पक्षाचे अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.