सर्व सावरकर प्रेमी, पदाधिकारी , कार्यकर्ते आणि पुणेकरांनो सावरकर गौरव यात्रेत उस्फुर्तपणे सहभागी व्हा…, , चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

5

पुणे : देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील स्वतंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी भाजपकडून एक अनोखा उपक्रम राबविला जात आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या गौरवार्थ सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कोथरूड येथे रविवार दिनांक ९ एप्रिल २०२३ रोजी, सायंकाळी ५:३० वाजल्यापासून सावरकर गौरव यात्रेला सुरवात होणार आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरवार्थ काढण्यात येणाऱ्या यात्रेद्वारे नव्या पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची ओळख करून देण्यात येणार आहे. यासाठी कोथरूड येथे या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी सर्व सावरकर प्रेमी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले.

भारतीय क्रांतिकारकांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या सन्मानार्थ सावरकर गौरवयात्रा ९ एप्रिल रोजी , सायंकाळी ५. ३० वाजता महर्षी कर्वे पुतळा, कर्वे रोड ते स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल, पौड फाटा अशी हि यात्रा आयोजित करण्यात आली आहे. होय मी सावरकर! आम्ही सारे सावरकर! असे याचे घोषवाक्य आहे. पुणेकरांनो सावरकर गौरव यात्रेत उस्फुर्तपणे सहभागी व्हा…, असे देखील चंद्रकांत पाटील यांनी आवाहन केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.