हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा अवमान मी केला हा आरोप मी सहन करणार नाही – चंद्रकांत पाटील

पुणे : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेनेचा बाबरी मशीद पाडण्याशी कोणताही संबंध नसल्याचा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते तथा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केला. यावरून खासदार संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. बाळासाहेबांचा अवमान केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. या आरोपाला प्रत्युत्तर देण्यासाठी आज चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली.  हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा अवमान मी केला हा आरोप मी सहन करणार नाही ,असे वक्तव्य पाटील यांनी यावेळी केले.

चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले कि,  हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबतीमध्ये नेहमीच माझ्यासारख्या  मुंबईमध्ये राहणाऱ्या सामान्य माणसाच्या मनामध्ये श्रद्धा आहे. बाळासाहेबांमुळे हिंदुत्ववादी विषयांना चालना मिळाली. मी मुंबईकर असल्यामुळे आणि  प्रामुख्याने दंगली ज्या भागात व्हायच्या अशा ठिकाणी मी राहिल्यामुळे मी नेहमीच असे म्हणतो कि बाळासाहबे ठाकरेंमुळे आज हिंदू जिवंत राहिला. त्यामुळे बाळासाहेबांचा अपमान हा विषय मनातही येणार नाही असे पाटील यांनी स्पष्ट केले.

बाबरी मशिदीचा मुद्दा आहे. बाबरी ढाच्या पाडण्याचा म्हणजे अयोध्येमध्ये राम जन्मभूमी आहे ते प्रस्थापित करण्याचे आंदोलन १९८३ मध्ये करण्यात आले. १९८३ मध्ये झालेले आंदोलन हे  विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली झाले. त्यापूर्वीही दोन वेळा अयोध्येमध्ये जी  कूच झाली ती विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून झाली. त्यामुळे प्रत्यक्ष ढाचा पडताना हे शिवसेनेचे हे शिवसेनेचे नाहीत असा भेद नव्हता , सगळे हिंदू होते. आणि हे सगळे जण एखाद्या संघटेनच्या बँनरखाली असतील तर ते म्हणजे बजरंग दलाच्या, विश्व हिंदू परिषदेच्या बॅनरखाली होती. स्वर्गीय आनंद दिघे साहेबांनी अयोध्या मंदिर उभारणीसाठी सोन्याची विट पाठवली होती.

मुद्दा असा आहे कि प्रत्यक्ष ढाचा पाडताना शिवसैनिक होते का तर हे शिवसैनिक आणि नॉन शिवसैनिक असे नव्हते ते प्रामुख्याने हिंदू होते. आणि नेतृत्व असेल तर ते विश्व हिंदू परिषदेचं होत हा माझा महत्वाचा मुद्दा असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. यामध्ये चुकून सुद्धा हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल अनादर व्यक्त करण्याचा मुद्दा नाही. नेहमीच मातोश्रीशी संबंधित राहिलो ,  संपर्कात राहिलो.

माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्याच काम आज पहिल्यांदाच झालं नाही तर ते  नेहमीच होत. गेल्या काहीदिवसांमध्ये ध चा मा करण्याचं काम सुरु असल्याचे पाटील म्हणाले. बाळासाहेब ठाकरेंचा अवमान मी केला हा आरोप मी सहन करणार नाही.बाळासाहेब  ठाकरेंचं हिंदू माणसांवरच ऋणं हे कोणी पुसूच शकत नाही, असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!