खोपोलीच्या बोरघाटात खासगी बस कोसळल्याची घटना अत्यंत दुर्दैवी… मृतांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी, चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले दुःख

लोणावळा : आज सकाळी जुन्या पुणे – मुंबई महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळून भीषण अपघात घडला आहे. या घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला असून ३० जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हि घटना अतिशय वेदनादायी असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर खोपोलीच्या बोरघाटात खासगी बस कोसळल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना अतिशय वेदनादायी आहे. या घटनेमध्ये १३ जणांचा मृत्यू आणि ३० जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. घटनेतील जखमींना तात्काळ उपचारासाठी नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.…
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) April 15, 2023
लोणावळ्याजवळ असलेल्या बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने हि बस निघाली होती, यावेळी चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बसमधून ४५ पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती मिळाली आहे.