प्रत्येक बूथ स्तरावर संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आणि केंद्र व राज्य सरकारच्या जनकल्याणकारी योजना घराघरात पोहोचवण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हावे, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

6

पुणे : पुणे येथे भाजपा छत्रपती शिवाजीनगर मंडलाचा ‘कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग’ संपन्न झाला. या प्रशिक्षण शिबिरात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून उपस्थित सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना पाटील म्हणाले, भारतीय जनता पार्टी हा केवळ राजकीय पक्ष नसून विचारांनी प्रेरित असलेले एक कुटुंब आहे. ‘संघटन’ हाच आपल्या कार्याचा मुख्य आधारस्तंभ असल्याने, आगामी काळात प्रत्येक बूथ स्तरावर संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आणि केंद्र व राज्य सरकारच्या जनकल्याणकारी योजना घराघरात पोहोचवण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हावे, असे आवाहन यावेळी पाटील यांनी केले.

याप्रसंगी पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, महापालिकेतील आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.