पुणे रेल्वे स्टेशन येथे महामानवास मंत्री चंद्रकांत पाटील यांचे अभिवादन; ‘एकता मिसळ’द्वारे समतेचा जागर

10

पुणे : भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यातील विविध कार्यक्रमांत सहभागी होऊन महामानवास विनम्र अभिवादन केले. रेल्वे स्टेशन येथील स्मारकास भेट देऊन पाटील यांनी बुद्ध वंदना घेतली आणि तथागतांचे स्मरण केले.

याप्रसंगी आमदार चेतन तुपे, महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, गटनेते गणेश बिडकर आणि भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘एकता मिसळ’चा आस्वाद आणि समतेचा संदेश

अभिवादन सोहळ्यानंतर मंत्री पाटील यांनी माजी आमदार दीपक पायगुडे यांच्या संकल्पनेतून आयोजित ‘भव्य एकता मिसळ’ कार्यक्रमाला भेट दिली. जयंतीनिमित्त शहरात येणाऱ्या अनुयायांसाठी आयोजित या उपक्रमाचे कौतुक करत पाटील यांनी स्वतः मिसळचा आस्वाद घेतला. “समतेचा आणि एकतेचा संदेश देणारा हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे.” असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले. या दोन्ही कार्यक्रमांच्या माध्यमातून पुण्यात भीम जयंतीचा उत्साह आणि सामाजिक एकतेचे दर्शन घडले.

Get real time updates directly on you device, subscribe now.