मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘चितळे बंधू व्हिजन पार्क’चे उदघाटन व कोनशिला अनावरण सोहळा उत्साहात संपन्न

5

पुणे : भोर, पुणे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘चितळे बंधू व्हिजन पार्क’ चे उद्घाटन व कोनशिला अनावरण संपन्न झाले. याप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. यावेळी या भव्य प्रकल्पाची पाहणी करण्यात आली. मंत्री पाटील यांनी मुख्यमंत्री महोदयांसोबत प्लांटमधील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती घेतली.

या प्रसंगी आमदार भीमराव तापकीर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, चितळे बंधूचे व्यवस्थापकीय भागीदार इंद्रनील चितळे व इतर मान्यवर उपस्थित होते.

‘चितळे’ हा एक ग्लोबल ब्रँड झाला असून 35 देशांमध्ये पोहोचला असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. तसेच हा ब्रँड उर्वरित देशांमध्येही पोहोचेल असे प्रतिपादन केले.

चितळे बंधूंच्या 4 पिढ्यांनी विविध काळातील आव्हानांना सामोरे जात आम्ही देखील ग्लोबल ब्रँड बनवू, हा आत्मविश्वास दाखविला आहे. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात चायनीज, जॅपनीज, इटालियन, कोरियन अशा विविध खाद्यपदार्थांचे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स पाहायला मिळतात. आपल्या महाराष्ट्रात तर, दर 10 किमीवर खाद्यसंस्कृती बदलते. या सर्व खाद्यसंस्कृतींमध्ये अनेक चांगल्या प्रकारची व्यंजने आहेत. या व्यंजनांना एका ब्रँडच्या स्वरूपात जगभर घेऊन जाण्याचे काम चितळे बंधूंनी केले आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, जगभरातील भारतीय रेस्टॉरंटमध्ये एकेकाळी फक्त भारतीय लोक दिसायचे, मात्र आता तिथे भारतीय कमी आणि परदेशी लोक अधिक दिसतात. पुढील काळात चितळेंचे पदार्थ परदेशातही लोक रांग लावून घेताना दिसतील.

Get real time updates directly on you device, subscribe now.