‘रोल बॉल’ या क्रीडा प्रकाराच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज पुणे दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उदघाटन तसेच भूमिपूजनन करण्यात आले. आज चंद्रकांत पाटील यांनी रोल बॉल क्रीडा स्पर्धेतील सहभागी देशांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यासोबतच कोथरूडमध्ये स्वयंपुनर्विकासासाठी सुरु केलेल्या मोफत कायदेशीर सल्ला उपक्रमाचे उद्घाटन केले.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, पुण्यात जन्मलेल्या ‘रोल बॉल’ या क्रीडा प्रकाराच्या सहाव्या जागतिक स्पर्धेचे यजमान पद पुण्यालाच मिळालं आहे. या स्पर्धेत एकूण १५ देशांचे खेळाडू सहभागी झाले असून, पालकमंत्री या नात्याने स्पर्धेतील सहभागी देशांच्या प्रतिनिधींशी यावेळी चंद्रकांत पाटील यांनी संवाद साधला. तसेच स्पर्धेच्या नियोजनाबाबत सर्वांचे कौतुक केले. ‘रोल बॉल’ या क्रीडा प्रकाराच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही देखील यावेळी दिली आणि काही सामान्यांचा पाटील यांनी आस्वाद घेतला.

