महर्षी स्त्री शिक्षण संस्थेच्या नर्सिंग महाविद्यालयाच्या दीपप्रज्वलन व पदवीप्रदान कार्यक्रमास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती

पुणे : महर्षी स्त्री शिक्षण संस्थेच्या बकुळा तांबट इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाच्या दीपप्रज्वलन व पदवीप्रदान कार्यक्रमास आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमातील नर्सिंगच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींचा ज्ञानार्जनासाठी दीपप्रज्वलन अतिशय पवित्र सोहळा पाहून चंद्रकांत पाटील प्रभावित झाले. कोविड काळात आरोग्य सेवक आणि सेविकांच्या अथक परिश्रमामुळे आपण त्यावर मात करु शकलो. त्याप्रती सर्वजण सदैव ऋणी असल्याची भावना यावेळी पाटील यांनी व्यक्त केली.

चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले कि, माझी मोठी बहीण हि देखील नर्स म्हणून दोन दिवसापूर्वी रिटायर्ड झाली. त्यामुळे नर्स काय काम करते हे मी जवळून अनुभवलं. नर्स ने अतिशय प्रामाणिकपणे काम केलं कि लोक तिला देव मानतात. कोविड मध्ये आपली सगळी यंत्रणा कमकुवत असल्याचे जाणवले. पीपीई किट, मास्क , व्हेंटिलेटर म्हणजे काय हे माहित नव्हते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हि सगळी परिस्थिती सांभाळून घेतली. आपण आता व्हेंटिलेटर एक्स्पोर्ट करू लागलो. आपण व्हॅक्सिन शोधलं. आपण जगातल्या ६० देशांना व्हॅक्सिन दिले, असे अभिमानाने चंद्रकांत पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांनी पुढे सांगितले कि मी एका कार्यक्रमात गेलो होतो तिथे अदर पुनावाला उपस्थित होते. त्यांच्या वडिलांनी त्यांनी या व्हॅक्सिनचा शोध लावला. त्यांना मी त्यावेळी विचारले कि कँसर वर व्हॅक्सिन नाही का आपण आणू शकत त्यावेळी ते म्हणाले आम्ही त्यावर व्हॅक्सिन शोधले आहे. लवकरच ते येईल. ९ वर्षाच्या मुलीला हे व्हॅक्सिन दिल जाईल जेणेकरून तिला ब्रेस्ट कँसर होणार नाही.

हे एक खूप पवित्र काम आहे आणि आपण हे वाढवायला हवं असे पाटील म्हणाले. नर्स हा खूप महत्वाचा फॅक्टर आहे. बेड रिटर्न पेशंटची सेवा करणं हे देखील वाढवायला पाहिजे असे पाटील म्हणाले.

यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष रविंद्र देव, सचिव डॉ. अभय शास्त्री, डॉ. धनंजय कुलकर्णी, बकुळा तांबट इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगच्या मुख्याधिपका डॉ. मीना गणपती, सिताबाई नरगुंदकर, महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका रुपा वर्मा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.