तब्बल पावणे सहा कोटी रुपयांचा मुद्देमालाचे हस्तांतरण, पोलीस दला विषयीचा अभिमान आणखी वाढला – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : पुणे पोलीस दला तर्फे मुद्दे माल हस्तांतरण सोहळा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज पार पडला. यामध्ये ज्यांच्या घरी, दुकानात किंवा रस्त्याने जाताना चोरी झाली होती अशा ५८ जणांना तब्बल पावणे सहा कोटी रुपयांचा मुद्देमाल कोर्टातून सोडवून पोलिसांच्या वतीने संबंधितांना सुपूर्त करण्यात आला.
पोलीस डिपार्टमेंट मधला एक खूपच अभिनव उपक्रम आहे. या ठिकाणी झाला गेल्या काही दिवसांमध्ये ज्यांची घरी, दुकानात, रस्त्याने जाताना चोरी झाली त्या चोऱ्या सापडल्या, तो मुद्देमाला कोर्टात जमा करायला लागतो आणि कोर्टातून मग तो सोडून द्यावा लागतो तर तो कोर्टातून सोडून घेण्यापर्यंतची प्रक्रिया पोलीस भरती पूर्ण केली. त्यामुळे मुद्देमाल असणाऱ्या 58 जणांना हा देण्याचा आणि या कार्यात ज्या पोलिसांनी कर्तव्य बजावले अशा पोलीस अधिकाऱ्यांचा देखील सन्मान करण्याचा खुपच भावस्पर्शी कार्यक्रम झाला. ज्यांचा ऐवज सापडला त्यांचा चेहऱ्यावरील आनंदाचा भाव पाहून पोलीस दला विषयीचा अभिमान आणखी वाढला असल्याचे यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील म्हणाले.
१०० कोटींचा पोलीस कल्याण निधी
पुणे शहर, पिंपरी व ग्रामीण असा १०० कोटी रुपयांचा पोलीस कल्याण निधी देणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी देणार असल्याचे सांगितले. जिल्हा नियोजन मधून ४० कोटी देण्यात येणार असून उर्वरित ६० कोटी रुपये सीएसआर च्यामाध्यमातून जमा करण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार असून त्यामुळे कल्याण निधी मधून पोलिसांच्या मुलींच्या शिक्षणाचा एकाही अर्ज परत जाता कामा नये असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.