महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघाच्या मागण्यांसंदर्भात लवकरच संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक, चंद्रकांत पाटीलांनी केले आश्वस्त

10

 

मुंबई : महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघाच्या शिष्टमंडळाने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची मंत्रालय येथे भेट घेतली. यावेळी आपल्या विविध मागण्यांसंदर्भात त्यांनी पाटील यांना निवेदन दिले.

चंद्रकांत पाटील यांनी उच्च व तंत्रशिक्षण विभागाची धुरा सांभाळतांना राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या प्रशांकडे नेहमीच विशेष लक्ष दिले आहे. निवेदन स्वीकारताच पाटील यांनी महासंघाच्या मागण्यांसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन, निर्णय घेण्याबाबत आलेल्या शिष्टमंडळास आश्वस्त केले.

यावेळी महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस डॉ.आर.बी.सिंह व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.