नागपूर : आजपासून नागपूर मध्ये हिवाळी अधिवेशनाचा प्रारंभ झाला. संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नागपूरमधील विधानभवनातील दालनात गणेश वंदन केले. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा इतर महत्वपूर्ण व्यक्तींच्या दालनात भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
चंद्रकांत पाटील यांनी आज विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदीय कार्य मंत्री या नात्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विधानसभा अध्यक्ष अँड राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे यांची विधान भवनातील कार्यालयात भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून विधान मंडळाचे कामकाज चांगल्या पद्धतीने पार पडावे, राज्यातील जनतेच्या प्रश्नांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करावा अशा सदिच्छा याप्रसंगी पाटील यांनी व्यक्त केल्या.
Get real time updates directly on you device, subscribe now.