जिल्हा माहिती कार्यालय निर्मित ‘अमरावतीचे वनवैभव’ कॉफी टेबल बुकचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रकाशन

25

अमरावती : जिल्ह्यातील वनराईने नटलेले वनवैभव, त्यातही मेळघाट परिसरातील निसर्ग वनसंपदा व वन्यजीव असा नैसर्गिक ठेव्याची समृद्धी दर्शविणाऱ्या ‘अमरावतीचे वनवैभव’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा माहिती कार्यालयनिर्मित ‘अमरावतीचे वनवैभव’ या कॉफी टेबल बुकच्या निर्मितीसाठी माहिती अधिकारी अपर्णा यावलकर यांचा पाटील यांच्या हस्ते सत्कार करुन अभिनंदन करण्यात आले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘अमरावतीचे वनवैभव’ या कॉफी टेबल पुस्तकात मेळघाटातील नयनरम्य निसर्ग सौंदर्य, अरण्यसंपन्न मेळघाटातील वन्यजीव, जैवविविधता यासह आदिवासी संस्कृती यांची उत्तम छायाचित्रासह माहिती देण्यात आली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील नैसर्गिक वारसा, वनसंपदा, कोरकू बांधवांची संस्कृती, चालीरीती यांची दुर्मिळ छायाचित्रे ही कॉफी टेबल बुकची वैशिष्ट्य आहेत.

अमरावतीचे वनवैभव हे कॉफी टेबल पर्यटन क्षेत्राला सहाय्यभूत तसेच संदर्भग्रथ म्हणून निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. पर्यावरणीय मूल्य जाणून जीवसृष्टीचे स्वरूप आणि वनसंपत्तीचे जतन करणे हे आपले मूलभूत कर्तव्य आहे. यामुळे यावर आधारित कॉफी टेबल बुक हे महत्त्वाचे पाऊल आहे .जिल्ह्यामध्ये येणारे पर्यटक अभ्यासक यांनाही हे पुस्तक फायदेशीर ठरणार आहे, असेही पाटील यावेळी म्हणाले.

कॉफी टेबल बुकसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे कॉफी टेबल बुकच्या प्रकाशन सोहळ्यास खासदार डॉ. अनिल बोंडे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, पोलीस अधीक्षक विशाल आनंद, मनपा आयुक्त सचिन कलंत्रे, पोलीस उपायुक्त शिवाजी शिंदे, सागर पाटील, जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार, माहिती अधिकारी अपर्णा यावलकर, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत मस्के आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.