राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्यासाठी येत्या ८ दिवसात निविदा काढण्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आदेश

यावेळी गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारत बांधकामासंदर्भात सादरीकरण करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञान संकुलाच्या दुसऱ्या टप्याच्या बांधकामाबाबत आढावा घेण्यात आला.अमरावती येथील शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्था येथे प्रत्येकी २०० मुला-मुलींच्या वसतीगृह बांधकामाबाबत आढावा घेण्यात आला.
या बैठकीत मुंबई येथील अधिक्षक अभियंता यांनी भारतरत्न लता मंगेशकर संगीत महाविद्यालयासंदर्भात सादरीकरण केले. मुंबईतील जवळपास १५ संस्थाच्या नवीन इमारती व अस्तित्वातील इमारतीच्या दुरुस्तीबाबत तसेच राज्यातील सर्व तंत्र निकेतन इमारतीचे दुरुस्ती व नुतनीकरण कामाचा आढावा घेण्यात आला.
कोल्हापुर येथील नवीन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवश्यक विविध बांधकामाबाबत अधीक्षक अभियंत्यांनी माहिती दिली. पुणे येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या मुलां-मुलींच्या वसतिगृहासंदर्भात अधीक्षक अभियंत्यांनी सादरीकरण केले. रायगड जिल्ह्यातील बाटू लोणेरे, जळगांव येथील प्रस्तावित सह संचालक कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाबाबत आढावा घेण्यात आला.