रिद्धपूर येथील मराठी विद्यापीठाच्या कामाला गती द्यावी, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

25

मुंबई : मंत्रालयात अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथील मराठी विद्यापीठ सद्यस्थिती संदर्भात सादरीकरण करण्यात आले. यावेळी अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून मराठी विद्यापीठाच्या कामाचे कालबद्ध नियोजन करून या कामाला अधिक प्राधान्य देऊन गती द्यावी, अशा सूचना यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

दरम्यान, सदर विद्यापीठाची मुख्य प्रशासकीय इमारत, कुलगुरू दालन, निबंधक दालन, आस्थापना बैठक व्यवस्था, थीमपार्क, विद्यार्थी बैठक व्यवस्था, ध्यानकेंद्र, स्वागतकक्ष, वाचनालय, मुले व मुलींकरिता स्वतंत्र वसतिगृहाची निर्मिती, मोठे बहुउद्देशीय सभागृह आणि विद्यापीठ सुरू करण्यासाठी कुलगुरुंची निवड, विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोई-सुविधा तसेच इतर आवश्यक बाबींची पुर्तता करण्याच्या प्रक्रियेला अधिक गती द्यावी, असे निर्देशही यावेळी पाटील यांनी दिले.

या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे विकासचंद्र रस्तोगी यांसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.