बाबुराव दौंडकर स्मारक संकुलाचे उदघाटन… बाबुरावांचे कार्य पुढे नेताना गावचा विकास, शेतकऱ्यांचा विकास यासाठी स्मारक समितीने प्रयत्न करावेत – चंद्रकांत पाटील

5

पुणे : जनसंघापासून ते भारतीय जनता पक्षाचे विचार पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रुजविण्याचे महत्वाचे काम करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे स्वर्गीय बाबुराव दौंडकर! संस्कारयुक्त ग्रामीण विकास हा बाबुरावांचा विचार होता. बाबुरावांचा हाच विचार पुढे घेऊन जाण्यासाठी शिरुर मधील रांजणगाव येथे बाबुराव दौंडकर स्मारक समितीच्या वतीने संकुल उभारण्यात आले आहे. या संकुलाचे उद्घाटन रा. स्व‌. संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भागय्याजी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, बाबुरावांनी आपल्या संपूर्ण जीवनकाळात सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने काम केले. त्यांचे हे कार्य पुढे नेताना गावचा विकास, शेतकऱ्यांचा विकास यासाठी स्मारक समितीने प्रयत्न करावेत असे आवाहन पाटील यांनी केले. यावेळी भागय्याजी यांनीही वोकल फॉर लोकलवर भर देण्याचे आवाहन केले.
यावेळी रा. स्व. संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, संभाजी आप्पा गवारे, बाबुराव दौंडकर स्मारक समितीचे अध्यक्ष ॲड. धर्मेंद्र खांडरे यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.