पुणे , १ जानेवारी : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आपल्या कोथरूड मतदारसंघातील नागरिकांच्या सोयी सुविधांचा नेहमीच विचार करत असतात. कोथरूड मधील अनेक गरजू लोकांना ते मदतीचा हात पुढे करतात. अशाच एका आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्याला त्याच्या शिक्षणासाठी लोकसहभागातून पाटील यांनी मदत केली. याच लहानग्या विद्यार्थ्याने आपल्या कुंचल्यातून रेखाटलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणीन चंद्रकांत पाटील यांचे चित्र पाटील यांना भेट स्वरूपात दिले.
चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कि, लहान मुलांमध्ये अनेक कलागुण दडलेले असतात. योग्य मार्गदर्शन आणि कलागुणांना वाव मिळाला की, ते आपल्या भावविश्वातून अख्खं जग जिंकतात. कोथरुड मतदारसंघातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील कुमार तेजुल पवार हा असाच एक प्रतिभावंत विद्यार्थी. तेजुलला शिक्षणाची प्रचंड आवड, त्यातही चित्रकला हा त्याच्या आवडीचा विषय. त्याची ज्ञानाप्रति ओढ ओळखून त्याच्या शिक्षणासाठी लोकसहभागातून मदत केली होती.
लहानग्या वयात तेजुलने आपल्या कुंचल्यातून रेखाटलेले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माझे चित्र भेट स्वरूपात दिले. त्याच्या प्रतिभेचे कौतुक करावे तेवढे कमीच वाटते, असे पाटील यांनी म्हटले.